Ad will apear here
Next
क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्जाविषयी..
क्रेडिट कार्डने वारेमाप खर्च केल्यानंतर या पैशांच्या परतफेडीचा प्रश्न उभा राहतो. ही रक्कम वेळेत भरली नाही, तर बराच दंड आकारला जातो. शिवाय क्रेडिट स्कोअर ही खराब होतो. अशा परिस्थितीत मदतीला येते ते  क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज....
....
आजकाल क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे आधी न देता खरेदी करता येते. नंतर ते पैसे भरायचे असतात; मात्र ही भलीमोठी रक्कम फेडताना अनेकदा कार्डधारकांच्या नाकी नऊ येतात. 

ही रक्कम वेळेत भरली नाही, तर बराच दंड आकारला जातो. शिवाय क्रेडिट स्कोअर ही खराब होतो. अशावेळी मदतीला येते ते क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज. 

नव्या जमान्यातल्या फिनटेक कंपन्यांनी या गरजेसाठी कर्ज द्यायला सुरुवात केली आहे. क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज हे लघुकर्ज असून, त्या अंतर्गत ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. 

या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारण बारा महिन्यांचा असतो. क्रेडिट कार्डच्या उर्वरित रकमेवर अधिक व्याजदर आकारला जातो; मात्र क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज १.५० टक्के व्याजदराने दिले जाते. त्यामुळे लाभदायी ठरते, मात्र ते वेळेत फेडणे आणि क्रेडिट कार्डच्या वापरावर मर्यादा राखणे गरजेचे आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZLZCH
Similar Posts
गुंतवणुकीचे संस्कार मुलं नोकरी-व्यवसाय करून स्वतःचे अर्थार्जन करू लागतात त्या वेळी सुरुवातीची चार-पाच वर्षं कमावलेला पैसा चैनीवर उधळतात; मात्र ही चैन पुढे महागात पडते. म्हणूनच बचतीचे संस्कार बालवयापासून करणं, घरातली बचत आणि खर्च या व्यवहारांची त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना गुंतवणुकीच्या पर्यायाची माहिती देणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत
स्वीप इन किंवा मल्टिप्लायर अकाउंट म्हणजे काय ? बँकांमध्ये विविध प्रकारची बचत खाती उघडता येतात. सर्वसाधारण बचत खाते, नो फ्रिल्स खाते, सॅलरी अकाउंट, प्रिव्हिलेज बँक खाते, तसेच लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीही वेगळ्या बचत खात्यांची सोय असते. यासोबतच स्वीप इन किंवा मल्टिप्लायर अकाउंट हा एक प्रकार असतो. स्वीप इन किंवा मल्टिप्लायर या प्रकारच्या
नोकरी/शहर बदलताय? तातडीने पैसे हवे आहेत? ‘फिनटेक लेंडर्स’कडून कर्जाचा पर्याय सुलभ नोकरी बदलताना एखाद्या दुसऱ्या शहरात जावे लागणे हे काही नवीन नाही. बऱ्याचदा जागा बदलताना विविध खर्च भागवण्यासाठी पैशांची गरज पडते. घर भाड्याने घेण्यासाठी काही आगाऊ रक्कम द्यावी लागते, इथपासून ते तुमच्या दैनंदिन गरजांसाठी बऱ्याच गोष्टी खरेदी कराव्या लागतात, इथपर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी पैशांची गरज लागते
फ्लॅट खरेदी आणि नवे निकष रेरा कायद्यामुळे फ्लॅट घेताना गुंतवणूकदारांना बऱ्याच गोष्टींची शाश्वती लाभत असली तरी रेराची मान्यता ही बांधकाम सुरू करण्यासाठी असते. शक्यतो तयार फ्लॅट घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आजच्या काळात फ्लॅट घेताना काही बाबतीत दक्षता घेणे गरजेचे आहे. त्या विषयी....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language